नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

। मुंबई । दि.26 जुलै 2022 ।  औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले.

राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला यांची आरक्षण सोडत काढल्यानंतर 6 ऑगस्ट 2022 रोजी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल.

त्यावर 6 ते 12 ऑगस्ट 2022 या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. दाखल हरकती व सूचनांचा विचार करून प्रभागनिहाय अंतिम आरक्षण 20 ऑगस्ट 2022 रोजी प्रसिद्ध केले जाईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.

---------

👉 मतदार ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करावे : मुख्य निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

👉 राष्ट्रपतीपदी विराजमान द्रौपदी मुर्मू यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभेच्छा

👉 अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचे पाच छापे

👉  नव्या संसद इमारतीत बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा लावण्यासाठी पंतप्रधानांना विनंती करणार : मुख्यमंत्री

Post a Comment

Previous Post Next Post