अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचे पाच छापे

अवैध देशी दारू विक्रीवर पोलिसांचे पाच छापे

एमआयडीसी पोलिसात गुन्हे दाखल


 
। अहमदनगर । दि.25 जुलै 2022 । एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध देशी दारू व गावठी हातभट्टी दारू विक्रेत्यांवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली. शनिवारी पाच ठिकाणी छापेमारी करीत दारू विक्री करणार्‍यांकडून मुद्देमाल जप्त करत त्यांच्याविरुध्द गुन्हे दाखल केले आहे.

सहाय्यक पोलिस निरीक्षक युवराज आठरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शेंडी शिवारात देठे वस्तीवर रोडलगत अवैध देशी दारू विक्री करणार्‍या संतोष पांडूरंग त्रिंबके (वय 45, रा. शेंडी) याच्याविरुध्द तसेच निंबळक शिवारात राहत्या घराच्या आडोशाला गावठी हातभट्टी दारूची विक्री करणार्‍या शंकर लालू यादव (वय 39) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्याच्याकडून दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तसेच निंबळक बायपास रोडवरील शिंदे वस्तीवर गावठी हातभट्टी विक्री करणार्‍या सुमन अशोक खंडागळे (वय 52) या महिलेवर गुन्हा दाखल करून तिच्याकडून एक हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. याशिवाय मनमाड रोडवरील हॉटेलच्या आडोशाला देशी दारूची विक्री करणार्‍या सचिन ज्ञानदेव शिंदे (रा. जोगेेशरी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) विरोधात गुन्हा दाखल केला

असून त्याच्याकडून पाचशे रुपयांची दारू जप्त केली व महेश सुरेश वाल्हेकर (वय 23, रा. पोखर्डी) हा नगर- औरंगाबाद जाणार्‍या रोडलगत गावठी हातभट्टी विक्री करताना मिळून आल्याने त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------

👉 केवळ सत्तेसाठीचे राजकारण सोडावे वाटतेे : नितीन गडकरी

👉 काँग्रेसच्या माध्यमातून किरण काळे शहराचे आमदार होतील : थोरात

👉  आदित्य ठाकरे यांचा शिर्डी आणि नेवासा येथे कार्यकर्त्यांशी संवाद

Post a Comment

Previous Post Next Post