विठ्ठला...एकनाथांना सांगा प्रचलितनुसार अनुदान दे! ; प्रचलित अनुदानासाठी प्राध्यापकांची दुचाकी दिंडी

विठ्ठला एकनाथांना सांगा प्रचलितनुसार अनुदान दे
प्रचलित अनुदानासाठी प्राध्यापकांची दुचाकी दिंडी

शनिवारी पंढरपूरला दिंडीचे प्रस्थान

। अहमदनगर । दि.08 जुलै 2022। उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षकांना प्रचलितनुसार अनुदान द्यावे या मागणीसाठी नगरहून पंढरपूरला दुचाकी दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीमध्ये नगर शहरासह पाथर्डी, श्रीगोंदासह जिल्ह्यातील प्राध्यापकासह महिला सहभागी होणार असल्याची माहिती प्रा. संजय शेवाळे, सुभाष चिंधे, सचिन पालवे, गिरमकरसर शेखर अंधारे यांनी दिली आहे. कोणतेही सरकार असो प्राध्यापकांचा पगाराचा प्रश्‍न सुटला गेला नसल्याने आता विठ्ठला तुच सांग एकनाथांना या प्राध्यापकांना पूर्ण दे, प्रचलितनुसार अनुदान दे असे साकडे शिक्षक घालणार आहे.

नगर शहरातील माळीवाडा येथील श्री विशाल गणेश मंदिर येथे दि. 9 जुलै रोजी दुपारी एक वाजता प्राध्यापकांची मोटारसायकल दिंडी पंढरपूरला प्रस्थान होणार आहे. या दिंडीमध्ये प्रा. झणझणेसर, विठ्ठल काळे, किशोर सप्रे, हरवणेसर, घायतडकसर, शेखसर, बाबरसर, खराडेसर, ज्ञानेश्‍वर बर्डे, गणेश पुंड, ऋषीकेश माताडे, प्रमोद कानडे, प्रा. उमादेवी राऊत, कल्पना तुपे, अश्‍विनी घोडके, विद्या बाबर, पुनम साठे, सुवर्णा बारगळमॅडम, विजया संसारे, शीतल कोतकर, सादियामॅडम, सोनाली गरड, अश्‍विनी पटेकर, भालसिंगसर यांच्यासह शेकडो शिक्षक या आंदोलन दिंडीत सहभागी होणार आहेत.

गेल्या वीस वर्षापासून उच्च माध्यमिक, कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यपकांच्या जीवाशी सरकार खेळ खेळत आहे. शिक्षकांनी विविध आंदोलन केली त्यांनतर सरकारला जाग येत नाही. पूर्ण पगार मिळावा, प्रचलितनुसार अनुदान मिळावे यासाठी शेकडो प्राध्यापकांचा बळी गेला असून त्याला सरकार जबाबदार आहे. मुंबई केलेल्या आंदोलनात पोलीसांनी शिक्षकांवर पोलीसांंनी लाठीहल्ला केला. शिक्षक ही गरिब गाय असल्याचे बोलले जाते त्यामुळे आजपर्यंत शिक्षकांनी कायदा हातात घेतला नाही, यापुढे घेणार नाही. 

याचाच फायदा घेत सरकार शिक्षकांच्या भावनांशी खेळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षकांच्या पगाराचा प्रश्‍न तातडीने सोडवावा, तसेच प्रचलितनुसार अनुदान देण्यासाठी तातडीने नियोजन करावे, तसे आदेश काढावे यासाठी पंढरपूरला मोटारसायकल दिंडी काढण्यात येणार असल्याने शिक्षकांनी या दिंडीत सहभागी व्हावे असे आवाहन संजय शेवाळे, सुभाष चिंधे, शेखर अंधारे, सचिन पालवे, गिरमकरसर यांनी केले आहे.

-------------

👉 धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ...

👉 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला मंत्रालयातील दालनातून...

👉 राष्ट्रीय व्यवस्थापन स्पर्धेत कृषि महाविद्यालय, पुणे येथील विद्यार्थ्यांचे तामिळनाडू कृषि...

Post a Comment

Previous Post Next Post