साठे कुटुंबियांची मदत प्रेरणादायी...

। अहमदनगर । दि.07 जुलै 2022।  कोरोना महामारीमुळे रोजगार गेले असून काहीजण बेघरही झालेले आहेत. याच काळात काही कुटुंबाचे आधार हिरवले गेले आहेत. अशा कुटुंबांना सावरण्यासाठी अनेक हात पुढे येत आहे. तसाच एक हात दत्तात्रय व शीतल साठे दामपत्याचा पुढे येत मुलाच्या वाढदिवसानिमित्त विधवा महिलेला शिलाई मशीन भेट दिलेली आहे.

कोरोना महामारीने सगळीकडेच हाहाकार उडवून दिलेला आहे. या काळात अनेकांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. काहींवर झालेल्या कर्जाच्या डोंगरामुळे बेघर होण्याची वेळ आलेली आहे. यातून सगळेच कुटुंब सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत.

मात्र या महामारी मध्ये काही कुटुंबाचे आधारच हिरवले गेले आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबांना आधार देण्यासाठी काही हात पुढे येत आहेत. मात्र मदत तुटपुंजीच ठरत आहे. 

कोरोना विधवा झालेल्या महिलांना आर्थिक मदत शासनाने करावी यासाठी लढा उभारण्यात आला आहे. त्यातच दत्तात्रय साठे व शीतल साठे यांनी  मुलगा यश याचा 17 वाढदिवस आगळ्या वेगळ्या पध्दतीने साजरा केला आहे.

यशच्या वाढदिवसानिमित्त होणार्या खर्चाला फाटा देऊन त्या पैशांची शिलाई मशीन खरेदी केली. आठवण (ता. नगर) येथील विधवा महिला सविता मोरे यांना शिलाई मशीन भेट दिली. यावेळी दत्तात्रय साठे, शीतल साठे, यश साठे, जयश्री औटी आदी उपस्थित होते. साठे कुटुंबियांनी दिलेल्या या मदतीमुळे मोरे कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

-------------

👉 अनोळखी व्यक्तीला लिफ्ट देणे पडले महागात

👉 जिल्हाभर अतिमुसळधार पाऊस कायम; पुढील चार दिवसांसाठी रेड अलर्ट

👉 विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपालांची सदिच्छा भेट घेतली

Post a Comment

Previous Post Next Post