एकनाथ शिंदे गटाचा ठाकरे गटाला आणखी एक धक्का...

 

। मुंबई । दि.15 जुलै 2022 । मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे 18 नगरसेवक, शिवसेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आज आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  यांना आणखी एक धक्का दिला आहे. ठाणे, कल्याण-डोंबवली व नवी मुंबईनंतर आता मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील 18 नगरसेवक शिंदे गटात सहभागी होणार आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात आज दाखल होत आहेत.

मीरा भाईंदर शहरात गेल्या 13 वर्षात शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात आणि पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोठा वाटा आहे.

महापालिकेचे १८ शिवसेना नगरसेवक, तसंच मीरा भाईंदर शहराची शिवसेनेची जी नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे.

त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक आज आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणार आहेत व शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. 

--------------

👉 सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार

👉 सूर्यानगर परिसरात वेश्या व्यवसायावर छापा

👉 बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना ....

Post a Comment

Previous Post Next Post