पेट्रोल अन् डिझेलच्या दर कपातीमुळे महागाईला आळा...


। मुंबई । दि.17 जुलै 2022 । राज्य सरकारने पेट्रोल, डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.  राज्यात पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर पाच व डिझेलच्या दरात तीन रुपयांची कपात झाली. या दर कपातीमुळे वाढणाऱ्या महागाईला किंचित आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 

मुंबईत इंधन दर स्थिर आहे. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचा दर 106.25 रुपये तर डिझेलचा दर  94.22 रुपये प्रतिलिटर आहे. तर देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 96.72 रुपये आणि एक लिटर डिझेलची किंमत 89.62 रुपये आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 102.63 रुपये प्रतिलिटर असून डिझेलचा दर 94.24 रुपये आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रतिलिटर आहे.  

राज्य सरकारने पेट्रोलवरील करात प्रतिलिटर पाच रुपये आणि डिझेलवरील प्रतिलिटर तीन रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर राज्यात पेट्रोल, डिझेलमधील दरात मोठी कपात झाली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.84 रुपये तर डिझेलचा दर 92.36 रुपये प्रति लिटर आहे.

नाशिकमध्ये पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.70 रुपये तर डिझेलचा दर 93.19 रुपये प्रतिलिटर आहे. नागपुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.03 रुपये तर डिझेलचा दर 92.58 रुपये प्रतिलिटर आहे. कोल्हापुरात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.29 रुपये तर डिझेलचा दर 92.83 रुपये प्रतिलिटर आहे.

--------------

👉 एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे राज्याच्या दौर्यावर...

👉 पंतप्रधान अन् मुख्यमंत्री यांना थेट मतदान करत नाही...

👉 प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नाही


Post a Comment

Previous Post Next Post