आशा सेविकांचे थकीत मानधन व चार महिन्यांचे वेतन मिळावे : स्नेहलता कोल्हे

। अहमदनगर । दि.29 जुलै । कोपरगाव शहर राज्यातील आशा सेविकांचे महाविकास आघाडी शासनाच्या  काळातील  थकीत मानधन  व चार  महिन्यांचे वेतन  तात्काळ अदा  व्हावे, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. 

👉 पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्यात मार्च 2020 पासुन कोरोना महामारी सुरू होती त्याचा प्रार्दुभाव जानेवारी 2022 पर्यंत मोठया प्रमाणात होता. कोरोना महामारीमुळे लॉक डाऊनची परिस्थिती निर्माण झालेली होती. या कठीण काळात आशा सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्ण शोधण्याचे काम केले.

👉 राज्यात वीज वितरण प्रणाली मजबूत करणार ग्राहकांसाठी प्रिपेड स्मार्ट मीटर बसविणार

त्यातुन अनेक आशासेविकांना कोरोनाची बाधा झाली, त्यांचे कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागला. त्यातून अनेकांच्या घरातील व्यक्ती मयत झाल्या आहेत. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत काम करून देखील मागील सरकारने त्यांना मानधन दिलेले नाही, यावरच त्यांच्या कुटूंबाची उपजिवीका अवलंबुन असल्यामुळे अनेक भगिनींपुढे आपला प्रपंच कसा चालवावा हा प्रश्न उभा राहिला आहे. 

👉 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी वैभव लांडगे बिनविरोध

अशीच परिस्थिती अंगणवाडी सेविकांचे बाबतीत झालेली आहे. त्यांनाही कोरोना काळातील मानधन मागील सरकारने दिलेले नाही. तेव्हा थकीत असलेले मानधन व 4 महिन्यांपासूनचे वेतन तातडीने देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी कोल्हे यांनी केली आहे.

👉 प्लास्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर राज्यात बंदी

Post a Comment

Previous Post Next Post