आदित्य ठाकरे यांचा शिर्डी आणि नेवासा येथे कार्यकर्त्यांशी संवाद

। अहमदनगर । दि.25 जुलै 2022 । युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे तीन दिवस शिवसंवाद यात्रेवर होते. रविवारी सकाळी त्यांनी औरंगाबाद त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा आणि शिर्डी येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शिंदे गटात सामिल झालेल्या आमदारांना त्यांनी अनेकदा गद्दार म्हणून संबोधले. 

रिमझिम पावसात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी जमा होते.  कार्यकर्त्यांनी ठाकरे जिंदाबादच्या घोषणा दिल्या. आदित्य ठाकरे मोठ्या गराड्यात संवाद यात्रा संपवून साईमंदिरात दाखल झाले. साईसमाधीचे दर्शन घेत आदित्य ठाकरे यांनी साईबाबांची पाद्यपूजा केली. त्यानंतर त्यांनी साई समाधीवर भगव्या रंगाची शॉल साई अर्पण केली. 

साईबाबांचे आशीर्वाद नेहमीच आमच्यासोबत असल्याच सांगताना राजकीय भाष्य करण्याच मात्र टाळले. दरम्यान, कालच्या औरंगाबादच्या सभेत त्यांनी शिवसेनेतून बंड केलेल्यांना गद्दार म्हणत त्यांचा समाचार घेतला. या सभेला शिवसैनिकांसह नागरिक मोठ्या संख्येने पाहायला मिळाले.

युवा सेना अध्‍यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे उपाध्‍यक्ष अ‍ॅड..जगदीश सावंत, मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत, विश्‍वस्‍त सर्वश्री राहुल कनाल, अ‍ॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, सुनिल शेळके व सचिन कोते,अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते

--------------

👉 एसटी बस अपघात: गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५० हजार रुपये 

👉 बालिकाश्रम रोडवर घरफोडी करत लाखाचा ऐवज लंपास

👉  नागरदेवळे नगर परिषदेला पाच कोटींच्या निधीचा बार फुसकाच... 


Post a Comment

Previous Post Next Post