लोक पुरात वाहून गेल्यानंतर सीना नदीची नालेसफाई होणार का : भुतारे


। अहमदनगर । दि.23 जुलै 2022 ।  शहरातील पूर्ण भागात सीना नदीची लांबी पाहता 14 किलोमीटर लांबीच्या या नदीची अजूनपर्यंत महानगरपालिकेच्या मार्फत नालेसफाई झालेली दिसत नाही. त्याचबरोबर खोकरनारला सुद्धा साफ केलेला दिसत नाही. त्यामुळे यावरून असे दिसून येते की महानगरपालिकेला जनतेच्या आरोग्याविषयी काही गांभीर्य राहिलेले नाही. 

जनतेचे आरोग्य जीव धोक्यात घालण्याचा प्रकार महानगरपालिका करत आहे. आज जर महाराष्ट्रात परिस्थिती पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्र हा पावसाच्या पाण्याने नद्यांना पूर येऊन वेढला गेलेला अनेकांचे प्राण गेलेले आहेत. आहे त्यातच नगर शहरात नालेसफाईचे काम महानगरपालिकेने हाती घेतलेले दिसत नाही कुठेतरी अर्धवट कामे करून हे काम थांबविल्याचे समजते.

परंतु जर येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात नगर शहरांमध्ये पाऊस झाला किंवा नगर शहराबाहेर पाऊस झाला. पूर येऊन सीना नदीला पाण्याचा फुगवटा होऊन तो जनतेच्या घरामध्ये घुसून  लोक वाहून जाण्याची वाट महानगर पालिका पाहत आहे, असे यावरुन दिसून येत असा टोला नितीन भुतारे यांनी लावला आहे.

जनतेचा आर्थिक नुकसान जीवितास धोका होण्याची मोठी संभावना असल्यामुळे मनसेचे नितीन भुतारे यांनी मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना निवेदनाद्वारे नाले सफाई सीना नदी सफाई खोकरनाला सफाई व इतर ओढून आले सफाई सर्व सफाई ताबडतोब हाती घेण्याची मागणी केलेली आहे.

अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आपल्या दालनात आंदोलन करण्यात येईल असा इशारा नितीन भुतारे यांनी दिला आहे. त्यामुळे महानगरपालिकेला हा प्रश्न ताबडतोब मार्गी लावणे गरजेचे आहे, असे यावरून दिसून येते जनतेच्या आरोग्याचा प्रश्न महानगरपालिकेत गांभीर्याने घेताना दिसत नाही.

यातून हे दिसून येते संपूर्ण सत्ताधारी व विरोधक यावर कुठेही बोलताना दिसत नाही मनसेने उपस्थित केलेल्या या मुद्द्याविषयी महत्त्वाची बाब म्हणजे पावसाळ्यापूर्वीच नाले सफाई होणे गरजेचं आहे.

परंतु महानगरपालिकेने यासाठी केलेला विलंब हा अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे लवकरात लवकर नालेसफाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी सुद्धा जनतेतर्फे करण्यात येत आहे.

--------------

👉 मराठी मुलुखाच्या प्रतिभेची मोहर उमटवणाऱ्या कलावंताचा अभिमान : मुख्यमंत्री

👉 नेप्ती उपबाजारात कांद्याला गुरुवारी काय मिळाला भाव...

👉 मोबाईल बँकिंग आणि पेमेंट सेवांवरील युएसएसडी आता नि:शुल्क

Post a Comment

Previous Post Next Post