माळीवाडा बसस्थानकातून विवाहित महिलेसह मुलगा बेपत्ता

। अहमदनगर । दि.18 जुलै 2022 ।  चोवीस वर्षीय महिला व तिचा लहान मुलगा हे दि.12 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास माळीवाडा बस स्टॅण्ड अहमदनगर येथून पुणे ते इंदौर जाणार्‍या मध्यप्रदेशच्या बसमध्ये बसून गेले आहे. पण ते मध्यप्रदेशला पोहोचले नाही. ते दोघे कोठे गेले, ते समजले नाही. 

तिच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी प्रताप हातला यादव (वय 26 वर्षे, हल्ली राहणार मु.पो.ज्योतिबावाडी, ता. कर्जत, जि.अ.नगर. मूळ राहणार  घर नं.60, वॉर्ड नं.07, मु.पो.दिवानी, ता. निवाली, जि. बडवाणी, रा.मध्यप्रदेश) यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन कोतवाली पोलिसांनी मनुष्य मिसींगप्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

हरवलेल्यांचे वर्णन असे- नाव : सीमा प्रताप यादव, वय 24 वर्षे, उंची 5 फुट. बांधा- सडपातळ, रंग सावळा, चेहरा-उभट, नाक- बसके, केस- लांब व काळे, डोळे- तरतरीत, पेहराव -लाल रंगाची साडी व ब्लाऊज लाल-निळया रंगाचे, पायात स्लीपर पांढर्‍या रंगाची चप्पल. सोबत सॅमसंग मोबाईल नं.6269099035 आहे.

सोबत लहान मुलगा शिवम प्रताप यादव, वय-3 वर्षे, रंग-गोरा, अंगात लाल टी शर्ट व काळया रंगाची पॅन्ट घातलेली. या वर्णनाची महिला व मुलगा यांच्याबाबत कोणाला काही माहीत असल्यास त्यांनी कोतवाली पोलिस ठाणे फोन नंबर 0241-2416117 यावर संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post