रुग्णाच्या चेहर्‍यावरील आनंद हीच आमच्या पाठीवरील शाबासकीची थाप: डॉ.विजय कवळे


। अहमदनगर । दि.02 जुलै । डॉक्टर्स डे निमित्ताने लायन्सक्लब ऑफ मिडटावूनच्या वतीने शुक्रवारी जिल्हा सरकारी रुग्णालय येथे  जिल्ह्यातील डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीनिवास बोज्जा यांनी डॉ.विजय कवळे यांचा सत्कार करुन डॉक्टर डे निमित्त शुभेच्छा दिल्या.

या सत्काराला उत्तर देताना डॉ.कवळे म्हणाले की, समाजाला आरोग्य  सेवा देणे हे आरोग्य सैनिक या नात्याने आमचे प्रथम कर्तव्य आहे. आणि ते आम्ही आजपर्यंत अखंडितपणे सामाजिक कर्तव्य म्हणून करत आहोत. रुग्णांचा आनंदी चेहराच आमची खरी संपत्ती असून रुग्न बरा झाल्यास रुग्ण सेवकांना शाबसकीची थाप दिल्याचा आनंद मिळतो.

तसे पाहता जगातील प्रत्येक माणूस हा समाजाचा देणेदार आहे, व  प्रत्येकाने समाजासाठी आपापल्या परीने योगदान हे दिलेच पाहिजे.  खरे तर आम्ही डॉक्टर्स किमान मी तरी शाब्बासकीची अपेक्षा न करता रुग्णसेवा करत असतो रुग्ण ठणठणीत बरा झाला आणि त्याच्या चेहर्‍यवरील सामाधान पाहताना आम्हाला शाब्बासकी  मिळाल्यासारखेच असते आणि त्यामुळे रुग्णसेवेचे कार्य करण्यासाठी देखील हुरूप येतो.

तसे पाहता एखाद्याचे कौतुक करणे किंवा एखाद्याला शाबासकी देणे हे तसे मानव जातीच्या दृष्टीने अवघडच, परंतु रुग्णसेवा सुरू केल्यापासून ते आजपर्यंत जे काही आरोग्य सेवेमध्ये कार्य केले त्या सेवेची, कामाची दखल लायन्स क्लब ऑफ मिडटावून ने घेतल्याने फार समाधान वाटले. अशा  पद्धतीने सार्वजनिक ठिकाणी  मिळालेल्या शाब्बासकीने , सत्काराने आम्हाला नवचैतन्य मिळाल्यासारखे  वाटते व काम करण्याचा आनंद दस पटीने वाढला आहे.

या आमच्या कामाची दखल घेऊन सत्कार रूपाने आम्हाला शाबासकी दिली त्याबद्दल आम्ही सर्वजन लायन्स क्लब ऑफ मीडटाउनचे  अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा व इतर आजी-माजी पदाधिकारी यांचा खूप खूप आभारी आहे, तसेच जिल्हा सरकारी रुग्णालयाचे डॉक्टर  गायकवाड डॉक्टर पानसंबळ यांचे देखील आभार मानतो असे डॉ.कवळे म्हणाले.

लाइन्स  क्लब ऑफ अहमदनगर मिटवून च्या वतीने डॉक्टर डेनिमित्त 25 डॉक्टरांचा सत्कार अहमदनगर शासकीय रुग्णालय येथे मिटवून चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा,  सचिव प्रसाद मांढरे व खजिनदार संदीप सिंग चव्हाण यांचे हस्ते  करण्यात आले. याप्रसंगी मिटवून चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे, माजी अध्यक्ष सौ संपूर्ण सावंत, डॉक्टर कल्पना ठुबे डॉ.विक्रम पानसंबळ व स्वाती जाधव, अशोक बोज्जा, अंबादास येन्नम उपस्थित होते.

याप्रसंगी सिव्हिल हॉस्पिटल चे नोडल ऑफिसर डॉ. निलेश गायकवाड, डॉ. सुवास घुले, डॉ. विवेक देशपांडे, डॉक्टर विजय कवळे, डॉ. दहितोडे, डॉ. ऋषिकेश घायाळ, डॉ. सुमय्या खान, डॉ. स्वाती कराड, डॉ. विक्रम पानसंबळ, डॉ. कल्पना ठुबे डॉक्टर लंके, डॉ. प्रमोद जगताप आदींचा यावेळी लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटावून च्या वतीने स्मृतीचिन्ह शाल देऊन सत्कार करण्यात आला

-----------

👉 माझ्यावरील राग मुंबईवर काढू नका : उध्दव ठाकरे यांचे आवाहन

👉 महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

👉 औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव...

Post a Comment

Previous Post Next Post