नगरमध्ये आषाढी एकादशी निमित्त योग दिंडीचे आयोजन


। अहमदनगर । दि.10 जुलै 2022।  येथील श्री रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट संलग्नित महावीर मलखांब आणि योगा ट्रेनिंग सेंटर यांच्यातर्फे  आज अहमदनगर शहरात योग दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या मोबाईल युगात आपल्या या नवीन पिढीला सन आपले धार्मिक सण उत्सव याची कायम माहिती असावी व ते सण उत्सव मुलांकडून नेहमी साजरे होवो व आशा या उत्सवातून आवड निर्माण मुलांमध्ये योगाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम करण्यात आला अशी माहिती एम एम वाय टी सी चे मुख्य प्रशिक्षक उमेश झोटिंग सर यांनी दिली.

अशा या स्तुत्य उपक्रमाचे श्री रामावतार मानधना चारिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी  मोहन मानधना यांनी कौतुक केले या उपक्रमात सर्व खेळाडू व पालक विठ्ठल रुक्माई ,वारकरी यांच्या वेशभूषेत उपस्थित होते. या कार्यक्रमात पारंपरिक वेशभूषेतील योगा मल्लखांब या पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके मुलांनी साजरे केले तसेच विठ्ठल माऊलीच्या पालखीची पूजा करून योगा सेंटर मधून पालखीची मिरवणूक काढण्यात आली.

चिमुकल्याण सोबत पालकांनीही या दिंडीत सहभागी होऊन फुगडी भजन कीर्तन अतिशय उत्साहात साजरे झाले, याप्रसंगी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून डॉ निलेश बकाल, अनिल सानप, राधिका कुलकर्णी,  भारती जासूद, प्रशिक्षक आप्पा लाढाने, प्रणिता तरोटे, सायली शिंदे, ऋतुजा आदी मान्यवरांसोब  सर्व पालक वर्ग व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

--------------

👉एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये महापूजा.... बीडमधील भाविकाला शासकीय पूजेत मान... 

👉 अमरनाथला ढगफुटीमुळे दरड कोसळून दुर्घटना ; अहमदनगरचे यात्रेकरून सुखरूप

👉 महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ

Post a Comment

Previous Post Next Post