सूर्यानगर परिसरात वेश्या व्यवसायावर छापा

। अहमदनगर । दि.15 जुलै 2022 ।  सूर्यानगर परिसरात सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे. 

याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत तोफखाना पोलिस ठाण्यात दोन महिला आरोपींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल कातकाडे, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग व तोफखाना पोलिसांनी गुरुवारी दुपारी ही कारवाई केली. सूर्यानगर परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार पथकाने छापा टाकून कारवाई केली. यात वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या एका व्यक्तीसह दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली आहे.

या प्रकरणी दोन महिला आरोपींसह सचिन शेडगे, किरण पवार, अक्षय काला, मच्छिंद्र पवार, गणेश बडे यांना ताब्यात घेतले. तर कैलाश काला पसार झाला आहे. फ्रीडम फर्म या सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी फिर्याद दिली आहे.

-------------

👉 पेट्रोल 5 डिझेल ३ रुपये स्वस्त होणार ..

👉 बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार

👉 सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार

Post a Comment

Previous Post Next Post