धूम स्टाइलने मंगळसूत्र चोरणारे दोघे गजाआड

। अहमदनगर । दि.02 जुलै । सावेडी उपनगरात महिलेच्या गळ्यातून धूम स्टाईलने दागिने चोरणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. सफीर अख्तर हुसेन खान (वय २०, रा. मुंब्रा टोलनाका, ठाणे) व कैलास कमलबहादूर नेपाली (वय २५, रा. नेरळ ममदापूर, ता. कर्जत जि. रायगड) अशी आरोपींची नावे आहेत. 

त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रूपये किमतीचे सात तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत.सफीर खान हा चोरलेले सोन्याचे दागिणे श्रीरामपूर येथे सोनाराकडे विक्री करण्यासाठी घेऊन जाणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक कटके यांना मिळाली होती. त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने सोने विक्रीसाठी घेऊन जाणार्‍या दोघांना ताब्यात घेतले.

--------------

👉 रुग्णाच्या चेहर्‍यावरील आनंद हीच आमच्या पाठीवरील शाबासकीची थाप: डॉ.विजय कवळे

👉 माझ्यावरील राग मुंबईवर काढू नका : उध्दव ठाकरे यांचे आवाहन

👉 घरघोडी करून १ लाख ८० हजारांचा ऐवज लांबवला

Post a Comment

Previous Post Next Post