पुन्हा अरमनाथ यात्रा सुरु

। अमरनाथ । दि.12 जुलै 2022। अमरनाथ गुहेजवळ ढगफुटी होऊन मोठी दुर्घटना घडली. त्यामुळे अमरनाथ यात्रा स्थगित करण्यात आली होती. आता यात्रा पुन्हा सुरु करण्यात आली आहे. जम्मूमधील बेस कँम्पमधून यात्रेकरुंचा पहिला गट अमरनाथच्या गुहेकडे जाण्यासाठी रवाना झाला आहे. यात्रा पुन्हा सुरु झाल्याने यात्रेकरुंमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

ढगफुटीनंतर चार दिवस ब्रेक लागलेली अमरनाथ यात्रा पुन्हा सुरु झाली आहे. भाविक बालटालमार्गे बाबा बर्फानीच्या गुहेकडे रवाना होत आहेत. पहलगामनंतर अमरनाथ यात्रा बालटाल मार्गे सुरू झाली आहे. आठ जुलैला पवित्र गुहेजवळ ढगफुटीनंतर  पूर आला होता. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 41 जणांचा शोध अद्यापही लागलेला नाही. 

बचाव पथक तीन दिवसांपासून अपघातग्रस्त भागाचा शोध घेत आहे. शुक्रवारी (ता.आठः झालेल्या ढगफुटीनंतर अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली होती. आता पहलगामचा रस्ता भाविकांसाठी खुला करण्यात आला आहे. बाबांचे भक्त पहलगाम व बालटाल मार्गे अमरनाथ गुहेत पोहोचत आहेत. 

-------------

👉 शिंदे गटातील आमदाराने सोमय्या यांना खडसावले... 

👉 कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकर्‍याने केली आत्महत्या

👉 अमरनाथला ढगफुटीमुळे दरड कोसळून दुर्घटना ; अहमदनगरचे यात्रेकरून सुखरूप

Post a Comment

Previous Post Next Post