राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदी अजित पवार


। मुंबई । दि.04 जुलै 2022। राज्यात शिवसेनेतील बंडखोर आणि भाजपचे सरकार आल्यानंतर आता विरोधी पक्षनेतेपदी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आज विधानसभा अध्यक्षांना याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर विरोधी बाकांवर सध्या राष्ट्रवादी काँग्रेस मोठा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्यांची वर्णी लागेल याबाबत चर्चा सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची नावे आघाडीवर होती.

अखेर पक्षाने अजित पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याबाबतचे अधिकृत पत्र विश्वास दर्शक ठराव मतदानानंतर विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले आहे. याची अधिकृत घोषणा करण्यात आले आहे.

---------

👉 बनावट विमा पॉलिसी देऊन सहा लाखाची केली फसवणूक

👉 अडीच वर्षांच्या अन्वी घाटगेची कळसुबाई शिखराला गवसणी

👉  शेतकऱ्यांना मोफत बी-बियाणे, रोख मदत देण्याची काँग्रेसची मागणी

Post a Comment

Previous Post Next Post