एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पंढरपूरमध्ये महापूजा.... बीडमधील भाविकाला शासकीय पूजेत मान...

। पंढरपूर । दि.10 जुलै 2022। आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. कोरोनामुळे पंढरपूरमध्ये भाविकांचा मेळा जमला नव्हता. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे पंढरपूरला दिड्या आल्या. विठूरायाच्या नामघोषाने पंढरपूर दणाणून गेले होते. भाविकही विठूरायाची जयघोष करीत तल्लीन झालेले आहे.

यंदा बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावचे वारकरी आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली.मुख्यमंत्र्याच्या हस्ते शासकीय पूजा झाल्यानंतर भाविकांसाठी दर्शनाला मंदिर खुले ठेवण्यात आले. दिवसभर दर्शनासाठी भाविकांच्या रांगा.लागल्या होत्या. 

आषाढी एकादशीच्या मंगलदिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पांडुरंगाची महापूजा केली. यामुळे बीड जिल्ह्यातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या भाविकांमुळे बीड जिल्ह्याला मान मिळाल्याने भाविकांमधून या दाम्पत्याचे अभिनंदन केले जात आहे.

राज्यात नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्याने आचारसंहिता लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासाठी जिल्हा प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. त्या विनंतीली निवडणूक आयोगाने परवानगी दिली. मात्र तीन अटींसह ती परवानगी देण्यात आली होती.

पूर्वनियोजित शासकीय कार्यक्रमांमध्ये कोणत्याही निधी विकास योजना, कार्यक्रमांची घोषणा करू नये. सर्व कार्यक्रमांसाठी आवश्यक त्या नियमानुसार परवानग्या घेण्यात याव्यात. कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यास हरकत नाही, पण त्या ठिकाणीही उपरोक्त अटींचे पालन करण्यात यावे, असं निवडणूक आयोगाने म्हटलं आहे.

--------------

👉 अमरनाथला ढगफुटीमुळे दरड कोसळून दुर्घटना ; अहमदनगरचे यात्रेकरून सुखरूप

👉 केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार : मुख्यमंत्री

👉 महाराष्‍ट्र विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या सदस्यांना शपथ

Post a Comment

Previous Post Next Post