माझ्यावरील राग मुंबईवर काढू नका : उध्दव ठाकरे यांचे आवाहन

। मुंबई । दि.01 जुलै । एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी होत असल्याचे दिसल्याने अखेर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आज प्रथमच उद्धव ठाकरे शिवसेना भवनात आले होते.

शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेत त्यांनी माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारला केलं आहे.

नव्या सरकारने सत्तेवर येताच आरेमधून कांजूरमार्गला नेलेले कारशेड पुन्हा आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी सरकारला हे आवाहन केलं आहे.

मेट्रो शेड प्रकल्पाची जागा बदलण्याबाबत झालेल्या चर्चेवर उद्धव ठाकरे यांनीही आपले मत मांडले. गुरुवारी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच पहिली कॅबिनेट घेतली. 

या बैठकीत त्यांनी आरे येथील मेट्रो कार शेड व जलयुक्त शिवार योजनेच्या कामाला पुन्हा एकदा सुरुवात करा, असे आदेश दिले. 

यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, "माझा राग मुंबईकरांवर काढू नये. मेट्रो शेडच्या प्रस्तावात बदल करू नका. मुंबईच्या वातावरणाशी खेळू नका. आम्ही कंजूर मार्गचा पर्याय सुचवलेला आहे तोच पुढे चालू ठेवा. आता तर केंद्रात आणि राज्यात देखील तुमचंच सरकार आहे."

-----------

👉 महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

👉 खरेदीच्या बहाण्याने सोने चोरी

👉 औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव

Post a Comment

Previous Post Next Post