एकाच दिवसात पाच दुचाकी चोरीला; तपासाचे आव्हान


। अहमदनगर । दि.27 जुलै 2022 । शहर, उपनगरातून दुचाकी चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सर्वच पोलीस ठाणे हद्दीतून दुचाकी चोरीला जात आहेत. पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतरही दुचाकी चोरीचा तपास लागत नाही. कोतवालीतून दोन तर तोफखाना, भिंगार कॅम्प व एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीतून प्रत्येकी एक अशा पाच दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी संबंधीत पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

नगर कॉलेजच्या पाठीमागील एनसीसी ग्राऊंडमधून सनी रमेश शिंदे (रा. नागरदेवळे ता. नगर) यांची दुचाकी चोरीला गेली. शिंदे यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. मार्केट यार्ड येथील त्रिमुखे हॉस्पिटलच्या खाली जिन्याजवळून मार्कस मारूती बोरूडे (रा. बोल्हेगाव) यांची दुचाकी चोरीला गेली. बोरूडे यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दिली आहे. 

एमआयडीसीतील रेणुकामाता मंदिराच्या गेटसमोरून दत्तात्रय पोपट विटेकर (रा. नवनागापूर) यांची दुचाकी चोरीला गेली. विटेकर यांनी एमआयडीसी पोलिसांत फिर्याद दिली आहे. प्रेमदान चौकातील शाहीइन हॉटेलसमोरून रामकृष्ण लक्ष्मण पिंपळे (रा. सावेडी) यांची दुचाकी चोरीला गेली. पिंपळे यांनी तोफखाना ठाण्यात फिर्याद दिली आहे. भिंगारमधील तुक्कड ओढा येथून संकेत बेरड (रा. तुक्कड ओढा) यांची दुचाकी चोरीला गेली.

------------

👉 गडकिल्ल्यांच्या दुरवस्थेवर उपाययोजना करा : संभाजीराजे

👉 नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

👉 घाबरू नका, मंकी पॉक्सविषयी जाणून घ्या… खबरदारी बाळगा

Post a Comment

Previous Post Next Post