पेट्रोल 5 डिझेल ३ रुपये स्वस्त होणार ..

 

। मुंबई । दि.14 जुलै 2022 । पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

कॅबिनेटच्या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत राज्यातील पेट्रोल - डिझेलच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर कमी करण्याचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6 हजार कोटींचा भार पडणार आहे.
 
पेट्रोल - डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार आहे.
-----------------

Post a Comment

Previous Post Next Post