50 हजार लाच स्वीकारताना महसूल सहाय्यकास पकडले


। अहमदनगर । दि.29 जुलै । शेवगाव तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागातील एका महसूल सहाय्यकास 50 हजार रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी रंगेहात पकडले. हरेश्र्वर रोहिदास सानप (वय 36, तहसिल कार्यालय, शेवगाव) असे लाचखोर कर्मचार्‍याचे नाव आहे.

👉 आशा सेविकांचे थकीत मानधन व चार महिन्यांचे वेतन मिळावे : स्नेहलता कोल्हे

तक्रारदारावर शेवगाव पोलिस ठाण्यात वाळू चोरीबाबत गुन्हा दाखल होता. त्यावेळी त्यांचा वाळूचा डंपर गुन्ह्यात जप्त करण्यात आला होता. सदर डंपर परत मिळण्यासाठी तक्रारदाराणे न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने तहसीलदारांकडून अहवाल मागितला आहे.

👉 जेष्ठ पत्रकार सुधीर पवार यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून केले नेत्रदानाचा संकल्प

तक्रारदार यांच्या बाजूने अहवाल तयार करून देण्याकरिता आरोपीने 1 लाख रुपये, तसेच स्वतःच्या घराच्या बांधकामाकरिता 1 डंपर वाळू अशी लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला टप्पा 50 हजार रुपये स्वीकारताना आरोपीला रंगेहात पकडण्यात आले.

👉 पोलिसांच्या घरांसाठी सर्वंकष आराखडा तयार करावा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक विभागाचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकचे उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस नाईक प्रकाश महाजन, मनोज पाटील, चालक पोलिस हवालदार उमेश पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली.

👉 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या उपाध्यक्षपदी वैभव लांडगे बिनविरोध

Post a Comment

Previous Post Next Post