पाय घसरून विहिरीत पडल्याने 46 वर्षीय इसमाचा दुर्दैवी मृत्यू


। अहमदनगर। दि.12 जुलै 2022 ।  शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना नगर तालुक्यातील चास शिवारात शुक्रवारी (दि. 8) दुपारी घडली. अरुण बन्सी गायकवाड (वय 46, रा. चास गावठाण ता. नगर) असे मयत इसमाचे नाव आहे.

मयत गायकवाड हे नगर पुणे महामार्गावरील एका पेट्रोल पंपावर कामास होते. शुक्रवारी (दि.8) सकाळी ते मोटारसायकलवर गावच्या परिसरात असलेल्या ब्राम्हणदरा भागात असलेल्या त्यांच्या शेतात पाहणी करण्यासाठी गेले होते.

शेतातील विहिरीत डोकावून पाहत असताना तोल जावून अथवा पाय घसरून ते विहिरीत पडले असावेत अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दुपारी उशिरापर्यंत ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची शोधाशोध केली असता शेताजवळ त्यांची मोटारसायकल आढळून आली.

त्यानंतर शेताच्या परिसरात शोध घेण्यात आला. शेवटी एकाने विहिरीत डोकावून पाहिले असता गायकवाड यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मयत घोषित केले.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस नाईक राहुल शिंदे हे करीत आहेत.

--------------

👉 जीएसटी विभागाच्या कारवाईत १६१ कोटींच्या बनावट बिलाबाबत कंपनी मालकास अटक

👉 राष्ट्रवादी देणार ओबीसींना 27 टक्के उमेदवारी

👉 शिंदे गटातील आमदाराने सोमय्या यांना खडसावले...

Post a Comment

Previous Post Next Post