राष्ट्रवादी देणार ओबीसींना 27 टक्के उमेदवारी

। मुंबई । दि.11 जुलै 2022 । ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी महत्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.

पाटील म्हणाले की,  ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वचजण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत.  यापुढेही करत राहू असे आश्वासनही पाटील यांनी दिले आहे.

राज्यातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगरपरिषदा आणि ४ नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे. त्यामुळे या निवडणुकांमध्ये जर ओबीसींना 27 टक्के जागा मिळाल्या तर त्यांना न्याय मिळणार आहे.

--------------

👉 माजी मंत्री प्रा.राम शिंदेंच्या रुपाने सर्वसामान्यांना न्याय...

👉 शिंदे गटातील आमदाराने सोमय्या यांना खडसावले...

👉 मेळघाट येथे दूषित पाण्याने मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये : मुख्यमंत्री

Post a Comment

Previous Post Next Post