संजय राऊत यांची 10 तास ईडी चौकशी

। मुंबई । दि.02 जुलै । अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची जवळपास दहा तास चौकशी करण्यात आली. ईडी कार्यालयातून बाहेर पडताना आयुष्यात चुकीचं असं मी काहीच केलं नाही. वेळ पडल्यास पुन्हा चौकशीस येईन, असं संजय राऊत म्हणाले.

पत्रा चाळ प्रकरणातील कथित घोटाळ्या प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडीने नोटीस बजावली होती. त्यानुसार संजय राऊत यांनी आज मुंबईतील ईडी कार्यालयात जाऊन जबाब नोंदविला. दुपारी 12 वाजता चौकशीसाठी पोहचलेले संजय राऊत रात्री 10 वाजण्याच्या सुमारास ईडी कार्यालयाबाहेर आले.

मी निर्भर आणि बेडर व्यक्ती आहे. कारण मी आयुष्यात कधीच चुकीचं काम केलेलं नाही. त्यामुळे मी निर्भयपणे ईडीच्या चौकशीला सामोरा जात आहे. या देशाचा एक नागरिक म्हणून, राज्यसभेचा सदस्य म्हणून तपास यंत्रणेच्या चौकशीला सामोरे जाणे हे माझे कर्तव्य आहे. 

मी पळपुटा नाही. ही चौकशी राजकीय हेतूने प्रेरित आहे किंवा नाही, हे नंतर समोर येईल. पण मी एका निष्पक्ष यंत्रणेसमोर जात आहे, असा विश्वास मला असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

-------------

👉 धूम स्टाइलने मंगळसूत्र चोरणारे दोघे गजाआड

👉 माझ्यावरील राग मुंबईवर काढू नका : उध्दव ठाकरे यांचे आवाहन

👉 औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव...

Post a Comment

Previous Post Next Post