शिंदे - ठाकरे यांच्या याचिकांवर आता 1 ऑगस्टला होणार सुनावणी

सर्व पक्षांनी 27 जुलैपर्यंत समस्यांची यादी सादर करावी; काही मुद्दे घटनापिठाकडे पाठविले जाऊ शकतात : सुप्रीम कोर्ट

। नवी दिल्ली । दि.20 जुलै 2022 ।  महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गट आणि एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवर सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांच्या खंडपीठासमोरील सुनावणी दरम्यान, कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडली. जर एकनाथ शिंदे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली तर निवडून आलेले सरकार पाडले जाऊ शकते. 

ते म्हणाले की, हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुरू असताना नव्या सरकारने शपथ घ्यायची नव्हती. या युक्तिवादावर एकनाथ शिंदे गटाच्या वतीने हरीश साळवे म्हणाले की, लोकशाहीत लोक एकत्र येऊन पंतप्रधानांना सांगू शकतात की माफ करा, आता तुम्ही पंतप्रधान राहू शकत नाही. ज्या नेत्याला 20 आमदारांचाही पाठिंबा मिळू शकला नाही, 

तो मुख्यमंत्री कसा राहू शकतो, असाही प्रश्न साळवे यांनी उपस्थित केला. युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, गरज भासल्यास काही मुद्दे घटनापीठाकडे पाठवले जाऊ शकतात. त्याची पुढील सुनावणी 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. येत्या बुधवारपर्यंत (दि.27) सर्व पक्षांनी त्यांच्या समस्यांची यादी आमच्याकडे सादर करावी, अशाही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. 

----------------

👉 राज्याच्या प्रगतीसाठी लोकहिताचे निर्णय : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

👉 रामदास कदमांच उद्धव ठाकरेंना भावनिक आवाहन

👉 अल्पवयीन मुलीचा लैंगिकछळ केल्याप्रकरणी सक्तमजुरी

Post a Comment

Previous Post Next Post