। जालना । दि.27 जुन । राज्यामध्ये सत्तांतराचे वारे वाहत असतानाच आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याचे संकेत दिले आहेत.
रविवारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत जालना शहरात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं.
यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे यांनी टोपे यांना उद्देशून जालना जिल्ह्यात जे कामं करायचे असेल ते लवकर करून टाका, राज्य सरकारचे थोडे दिवस उरले असून
मी फक्त 2 ते 3 दिवस विरोधी पक्षात आहे, अशा प्रकारचं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी राजेश टोपे यांना उद्देशून केलं. दानवे यांनी 2 ते 3 दिवसांतच राज्यात सत्ता स्थापनेचे संकेत दिले आहेत.
-----------------
👉 एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात : राऊत
Tags:
Maharashtra