भाजपचे येत्या चार दिवसांमध्ये राज्यात सरकार : चिखलीकर


। पंढरपूर । दि.29 जुन । एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ५० आमदारांचा गट भाजपसोबत येणार आहे. येत्या चार दिवसांत राज्यात पुन्हा भाजपचे सरकार येणार असल्याचा दावा भाजपचे नांदेडचे खा. प्रताप पाटील-चिखलीकर यांनी केला. 

पंढरपूर येथे आषाढी वारी यात्रेच्या महापूजेला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच येतील, असे भाकीतही त्यांनी केले आहे.खा. चिखलीकर मंगळवारी श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चिखलीकर म्हणाले, राज्यातील आघाडी सरकार जाणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे ४० आमदार आणि अपक्ष १० असे ५० आमदार हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत येणार आहेत. त्याचबरोबर शिवसेनेचे १० ते १२ खासदारही आमच्या संपर्कात आहेत. तेसुद्धा भाजपसोबत येतील, असा दावाही चिखलीकर यांनी केला.

-----------------

👉 राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया

👉  आता मंत्रिमंडळामध्ये नगरचे वजन वाढले

👉  रावसाहेब दाणवे यांचा टोपे यांना सल्ला

Post a Comment

Previous Post Next Post