। अहमदनगर । दि.22 जुन । अहमदनगर जवळील केडगाव उपनगराच्या परिसरात सुरू असलेल्या तीन मटका अड्यांवर कोतवाली पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कारवाई केली. आरोपींकडून दोन हजार 110 रुपयांची रोख रक्कम आणि मटका जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
चिलू हरिभाऊ बोरूडे (वय 40, रा. लिंक रोड,नगर), मंगेश विजयसिंग तीर (वय 40, रा. डावरे गल्ली, नगर) आणि संतोष रघुनाथ अनारसे (वय 48, रा. भूषणनगर, केडगाव) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना केडगाव परिसरात तीन मटका-जुगारांचे अड्डे सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
माहितीच्या आधारे निरीक्षक शिंदे यांनी पोलिस नाईक गणेश धोत्रे, पोलिस कॉन्स्टेबल अमोल गाढे, दीपक रोहोकले, सोमनाथ राऊत यांना कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार त्यांनी कारवाई केली. कॉन्स्टेबल राऊत यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात आरोपी मटका जुगार खेळताना व खेळवताना मिळून आल्याने महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
-----------
👉 मुख्यमंत्रीपदच काय पक्षप्रमुखपदही सो़डायला तयार...
👉 शिवसेना आमदारांना गुजरातमध्ये मारहाण : राऊतांचा आरोप
👉 इलेक्ट्रिक वाहने वर्षात पेट्रोल गाड्यांच्या किमतीत मिळतील : गडकरी