। अहमदनगर । दि.26 जुन । माळीवाडा बस स्थानकाजवळ सुरू असलेल्या बिंगो जुगार अड्ड्यावर पोलिस उपाधीक्षक कातकाडे यांच्या पथकाने छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील बत्तीस हजार रुपये व जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई माळीवाडा वेस ते इम्पेरिअल चौकाकडे जाणार्या रोडवर श्रीगणेश मोबाईल शॉपीसमोर जिल्हा परिषदेच्या भिंतीलगत कामठी बांबूच्या आडोशाला असलेल्या जुगार अड्ड्यावर केली.
दि.24 रोजी नगर शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार तनवीर शेख, पोलिस नाईक हेमत खंडागळे, पोलिस नाईक महेश मगर यांनी हा छापा टाकला. कातकाडे यांना मिळालेल्या गोपनीय बातमीनुसार माळीवाडा वेस ते इम्पेरिअल चौकाकडे जाणार्या रोडवर श्रीगणेश मोबाईल शॉपी समोर जिल्हा परिषदेच्या भिंतीलगत कामठी बांबूचा आडोसा करून रोहित कदम व आकाश कदम यांच्यावर छापा टाकला गेला.
हे दोघे लोकांना प्रेरित करुन मोबाईलद्वारे एलसीडी स्क्रिनवर असलेल्या नंबरवर पैसे लावून बिंगो नावाचा हार-जितीचा जुगार खेळत व खेळवत होते. बांबूचा आडोसा केलेल्या शेडच्या दाराजवळून पाहिले असता दोघे लोकांना आकर्षित करुन 10 रुपये लावल्यावर 90 रुपये मिळतील असे जोरजोरात ओरडून लोकांना प्रेरित करुन बिंगो नावाचा जुगार खेळून व खेळवून टेबलावर प्लॅस्टिकचे पेपरवर असलेल्या आकडयावर पैसे ठेवून टेबलाजवळ असलेला व्यक्ती त्याच्या हातातील मोबाईलवर तसेच भिंतीवर असलेल्या एलसीडीवर रंगीत चित्रावरील आकडयावर लोक पैसे लावताना मिळून आले.
पळणारे पकडले : पोलिसांनी अचानकपणे त्या ठिकाणी छापा टाकला असता उभे असलेले दोन-तीनजण पोलिस आल्याची चाहूल लागताच उडया मारुन पळून गेले. त्यातील दोनजम पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना जागीच पकडले त्यांची नावे रोहित रवींद्र कदम (वय 29) व आकाश प्रकाश कदम (वय 26, दोघे रा. दीपक वाईन शेजारी, जिल्हा परिषद समोर, बौध्द वस्ती, माळीवाडा, अ.नगर) अशी आहेत. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कब्जात बिंगो नावाच्या हार-जितीच्या जुगाराची साधने त्यात मोबाईल, एलसीडी, रिमोट, रोख रक्कम, आकडयाचा प्लॅस्टीकचा कागद मिळाले. पोलिसांनी एकूण 32 हजार 780 रुपये किमतीचे बिगो जुगाराचे साहित्य जप्त केले. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी कॉन्स्टेबल सागर द्वारके यांच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद केली.
----------------
👉 एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात : राऊत
Tags:
Ahmednagar