। अहमदनगर । दि.26 जुन । जे वारकऱ्यांच्या मनात तेच पांडुरंग करतो आणि पांडुरंगाने ठरवले आहे. आषाढीची महापूजा कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजयदाडा विखे पाटील यांनी संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट, ताहाराबाद (ता. राहुरी) दिंडी पालखी पूजा आणि पायी दिंडी प्रस्तान कार्यक्रमात केले.
दोन वर्षांच्या विश्रांती नंतर पुन्हा एकदा राज्यभरातून हजारो दिंड्या पांडुरंगाच्या भेटीला जात आहे. श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताहाराबाद येथून पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आज महीपती महाराज यांच्या पालखीचे प्रस्थान आणि पालखी पूजन खासदार डॉ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच ताहाराबाद गावातून संत महिपती महाराज मंदिरा पर्यंतचा दिंडी मार्गाचे डांबरीकरण करण्यासाठी 25लक्ष निधी मंजूर केला असून त्याचे रस्त्याचे भूमिपूजन खासदार डॉ.विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष राजेंद्र साबळे,उपाध्यक्ष अविनाश कांबळे,भाजपचे जेष्ठ नेते आसाराम धुस, दिंडी प्रमुख ह.भ.प नाना महाराज गागरे,सरपंच नारायण झावरे,चांगदेव किंनकर,माजी सभापती भीमराज हारदे,डॉ बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर करखान्याचे सर्व संचालक ,माजी सभापती मनीषा ओहळ ,राहुरी तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी व सह सर्व ट्रस्ट चे सदस्य ग्रामस्थ व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर मनमाड रस्त्याचे काम रखडले असल्याने वारकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असते यासाठी खासदार डॉ. विखे पाटील यांनी केंद्र सरकार कडून विशेष १३कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. या निधीचा उपयोग नगर मनमाड रस्ता खोदलेला आहे अश्या ठिकाणी मुरुमीकरण करण्यासाठी वापर केला जाणार आहे. अशी माहिती खासदार डॉ. विखे पाटील यांनी दिली आहे.
वारकऱ्यांसाठी विळदघाट येथे विखे पाटील कुटुंबाकडून मोफत आरोग्य तपासणी आणि चहा पाणी आणि नाश्त्याची उत्तम सुविधा करण्यात आली आहे. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये याची काळजी घेणार असल्याचे खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले.
------------------