। मुंबई । दि.30 जुन । गेल्या दहा दिवसांपासून राजकीय घडामोडींनी सर्वत्र चर्चेचा विषय होता. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. आज सायंकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील.
बुधवारी रात्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याला एक पर्यायी सरकार देण्याची गरज होती, ती आम्ही देतोय. एकनाथ शिंदे हेच राज्याचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा आज भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. या सरकारची जबाबदारी आमची असेल, आज संध्याकाळी एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होईल.
देवेंद्र फ़डणवीस म्हणाले की, गेल्या वेळच्या निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेनेला बहुमत मिळालं, पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी हे बहुमत झुगारलं आणि हिंदुत्वाच्या विरोधात विचारधारेच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा विचार केला. या अडीच वर्षाच्या काळात या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला, या सरकारचे दोन मंत्री तुरुंगात जाणं हे खेदजनक आहे असे ते म्हणाले..
----------------
👉 जिल्ह्यातील सात ग्रामसेवकांवर गंभीर शिक्षा तर तीन...
👉 औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव....
👉 २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान
Tags:
Breaking