। मुंबई । दि.23 जुन 2022 । शिवसेनेचा ढाण्या वाघ अशी ख्याती असलेले नेते आमदार गुलाबराव पाटील हे देखील एकनाथ शिंदे यांच्या गोटात दाखल झाले आहेत.एकनाथ शिंदे यांना ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याची माहिती समोर येत आहे. यानंतर आता महाविकास आघाडी सरकारच काय होणार हा मोठा प्रश्न समोर उपस्थित झाला आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार कालपर्यंत सुरतच्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये थांबले होते. त्यानंतर आज पहाटे त्यांचं एअर लिफ्टिंग करुन त्यांना गुवाहाटीत नेलं गेलं. या सर्व आमदारांची राहण्याची व्यवस्था ही गुवाहाटीमधील ‘रेडीसन ब्लू’ हॉटेलमध्ये करण्यात आली आहे.
या हॉटेलमध्ये शिवसेनेचे 45 पेक्षा जास्त आमदार आहेत. यामध्ये गुलाबराव पाटील हे देखील आहेत. गुलाबराव हे शिंदे यांच्या गोटात गेल्याने अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
गुलाबराव यांचा त्या हॉटेलमध्ये प्रवेश करताना व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत गुलाबराव जेव्हा एकनाथ शिंदे यांना भेटतात तेव्हा ते त्यांचा पाया पडताना दिसत आहेत.
--------------
👉 वाढत्या कोविड संसर्गामुळे काळजी घेण्याची गरज: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Tags:
Breaking