। अहमदनगर । दि.28 जुन । राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर आता मुख्यमंत्री यांनी बंडखोरांचे मंत्रीपदे काढून घेतले आहे. यामध्ये नगरच्या गडाख व तनपुरें यांच्याकडे महत्त्वाची खाते देण्यात आली आहे. यामुळे नगरचे वजन पुन्हा एकदा राज्यात वाढले आहे.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या नवीन खाते बदलात नगर जिल्हयातील मंत्री शंकरराव गडाख यांना चार तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे तीन खाती देण्यात आली आहे. यामुळे नगरचे वजन पुन्हा एकदा राज्यात वाढले आहे.
मुख्यमंत्र्यानी केलेल्या खाते बदलात मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे कृषी माजी सैनिक, रोजगार आणि फलोत्पादन ही चार खाती नव्याने मिळाली आहे. तसेच राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे याच्याकडे वैद्यकिय शिक्षण, वस्त्रोद्योग आणि महसूल ही तीन खाती मिळाली आहेत.
----------------
👉रावसाहेब दाणवे यांचा टोपे यांना सल्ला
Tags:
Breaking