। अहमदनगर । दि.28 जुन । थकीत मालमत्ता कर न भरल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा मनपाने दिला आहे. मालमत्तांची जप्ती, नळकनेक्शन तोडणे अशी कारवाई केली जाणार आहे.
महाराष्ट्र मनपा अधिनियमातील कलम 140 अ नुसार सर्वसाधारण करात एप्रिलमध्ये 10 टक्के मे व जूनमध्ये 8 टक्के अशी मालमत्ता कराचा आगाऊ भरणा केल्यास सूट देण्याबाबतची तरतूद आहे.
सदरची सूट 30 2022 अखेर चालु आहे. त्यानुसार कराचा भरणा करून 8 टक्के संकलीत करात सवलत घेण्यात यावी. जे मालमत्ताधारक थकीत कराचा भरणा करणार नाहीत, अशा मिळकतींचा मालमत्ता कर वसुली होण्यासाठी जप्ती करणे,
मोठ्या थकबाकीदारांचे नळ कनेक्शन बंद करणे, तसेच मोबाईल टॉवर सील करणे यासारखी कारवाई करण्यात येणार आहे, असे मनपाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
-----------------
👉एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात : राऊत
👉 पांडुरंगाच्या मनात असेल, तोच मुख्यमंत्री महापूजा करेल
👉 मुख्यमंत्री ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान वर्षा सोडला, जिद्द सोडली नाही
Tags:
Ahmednagar