। मुंबई । दि.26 जुन 2022 । अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे अनेक आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. नाराज आमदारांनी बंड पुकारलेलं आहे. अशात शिवसैनिक मात्र भडकले आहेत.
या पार्श्वभूमीवर काल अनेक शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांच्या घराबाहेर तसंच कार्यालयात तोडफोड आणि दगडफेक केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर केंद्राने या आमदारांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आमदारांच्या घरांना सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत 15 आमदारांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार होणार आहे.
सध्या शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांनी बंडखोर आमदारांच्या फोटोला काळं फासलं आहे. तर अनेक ठिकाणी आंदोलनही केलं गेलं आहे. अशात कुटुंबीयांना धोका असल्याची तक्रार काही आमदारांनी केली होती. यानंतर केंद्राने आमदारांच्या कुटुंबीयांना आज संध्याकाळपासून सीआरपीएफ सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे आघाडी सरकार पडावे, यासाठी भाजपाचा प्रयत्न असल्याचे यातून स्पष्ट झालेले आहे. भाजपाचा हात असल्यामुळेच हा सर्व प्रकार सुरु आहे, असेही या वेळी समर्थकांनी म्हटले आहे.
------------------
👉 पांडुरंगाच्या मनात असेल, तोच मुख्यमंत्री महापूजा करेल
👉 एकनाथ शिंदे गटाकडून नाव निश्चितीकडे वाटचाल
👉 मुख्यमंत्री ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान वर्षा सोडला, जिद्द सोडली नाही