। अहमदनगर । दि.30 जुन । जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना गंभीर शिक्षा केल्या आहेत. तसेच तीन ग्रामसेवक यांना सेवा निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी केली.
जिल्ह्यातील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकारी यांचे विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना गंभीर शिक्षा केल्या आहेत. तसेच तीन ग्रामसेवक यांना सेवा निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आणखी काही ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कारवाई झालेले ग्रामसेवक व त्यांचे ठिकाण पुढील प्रमाणे आहे.
आर. बी. काळे, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत गायकवाड जळगाव, ता. शेवगाव यांना गैरवर्तनाबाबत बडतर्फ करण्यात आली आहे.
र. गु. शेलार, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत वडगाव तनपुरा, ता. कर्जत यांचे गैरवर्तनाबाबत सक्तिने सेवानिवृत्त कारवाई केली आहे.
ज्ञा. गो. सोनवणे, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत मिरी, ता. पाथडी गैरवर्तनाबाबत चार वेतनवाढी कायमस्वरूपी बंद केली आहे.
आ. दा. आखाडे, तत्कालीन ग्रामसेवक ग्रामपंचायत हळगाव, जामखेड येथे कार्यरत असताना अनियमितता व गैरहजर प्रकरणी दोन वेतनवादी कायमस्वरुपी बंद ही शिक्षा केलेली आहे. शि. दु. सुपे, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत लोणी खु. ता. राहाता येथे गैरवर्तन प्रकरणी दोन वेतनवाढी कायमस्वरूपी बंद केली.आहे.
आर. व्ही. बोर्ड, तत्कालिन ग्रामसेवक, ग्रामपंचायत बोधेगाव, ता. राहुरी गैरवर्तनाबाबत प्रकरणी एक वेतनवाढ कायमस्वरुपी बंद केली आहे.
ब. तु. शेटवाड, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत माळी चिंचोरा ता. नेवासा यांचे गैरवर्तनाबाबत एक वेतनवाढ तात्पुरती बंद करण्यात आली आहे.
सेवानिलंबित कारवाई झालेले ग्रामसेवक : इमान शेख, ग्रामसेवक, ग्रामपंचायत युरदैठण, ता. जामखेड पाक्षिक / मासिक समाना गैरहजर, विविध योजना राबविणेकामी दुर्लक्ष, महादेव मल्हारी ढाकणे, तत्कालिन ग्रामसेवक, दिघी, ता. नेवासा १४ वा वित्त आयोग आर्थिक अनियमितता, श. यु. पठाण, तत्कालिन ग्रामसेवक, ग्रामपंचायत काळेगाव, ता. शेवगाव गैरवर्तन व संशयित अपहार गटविकास अधिकारी पं.स. शेवगाव यांनी दि. २४/६/२०२२ रोजी गुन्हा दाखल केलेला आहे.
------------
👉 खरेदीच्या बहाण्याने सोने चोरी; दोन महिलांसह तिघांना अटक
👉 औरंगाबादचे नाव संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशिव....
👉 २७१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ ऑगस्टला मतदान
Tags:
Ahmednagar