मुख्यमंत्रीपदच काय पक्षप्रमुखपदही सो़डायला तयार...

। मुंबई । दि.22 जुन ।  मला पदाचा मोह नाही. मी ओढून ताढून खुर्चीला टेकून बसणारा नाही. मी आजच वर्षावरूनच मातोश्रीवर जायला तयार आहे. ज्यांना मी मुख्यमंत्री नको त्यांनी समोर येऊन सांगावे मी लगेच त्यांच्याजवळ माझा राजीनामा देतो, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारलेले आहे. या बंडानंतर मुख्यमंत्री यांनी पहिल्यांदाच संवाद साधला आहे. कोरोना पाॅझिटिव्ह असल्यामुळे त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून थेट जनतेशी संवाद साधला आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की, मी मुख्यमंत्री पदच काय शिवसैनिकाप्रमुखपदही सोडायला तयार आहे. फक्त शिवसैनिकांनी मला समोर येऊ सांगितले. तर मी लगेच सोडून द्यायला तयार आहे. फक्त आमदरांनी मला मुंबईत येऊन सांगावे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या शब्दाखातर मी मुख्यमंत्री झालो आहे.
 
प्रशासनाने मला खूूप सहकार्य केले. त्यामुळेच मी काम करू शकलो नाही, असेही ते म्हणाले. शिवसेना हिंदूत्वापासून दूर गेलेली नाही. शिवसेनेचा हिंदूत्व श्वास आहे. शिवसेना हिंदूत्वापासून दूर गेलेली नाही, असेही ते म्हणाले.

संध्याकाळी सहा वाजता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची शरद पवार हे वर्षा निवास्थानी जाऊन भेट घेणार आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.   

--------------

👉 माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निवासस्थानी भाजप नेत्या पंकजा मुंडे

👉 शिवसेना आमदारांना गुजरातमध्ये मारहाण : राऊतांचा आरोप

👉 पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना


Post a Comment

Previous Post Next Post