एकनाथ शिंदे गटाकडून नाव निश्चितीकडे वाटचाल

। मुंबई । दि.25 जुन 2022 । शिवसेना व ठाकरे नाव न वापरता जगून दाखवा, असे आव्हान शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी बंडखोरांना दिले.

त्यानंतर आज (शनिवारी) एकनाथ शिंदे गटाचे नाव समोर येत आहे. शिवसेना-बाळासाहेब ठाकरे असे नाव शिंदे गटाने निश्चित केलं आहे. याबद्दलची घोषणा संध्याकाळी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपल्यासोबत एकूण ४६ आमदार आहे. शिवसेनेचे दोन-तृतीयांश आमदार आपल्यासोबत आहेत. त्यामुळे खरी शिवसेना माझ्यासोबत असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे त्यांच्या गटाला काय नाव देतात, याची उत्सुकता होती.

शिंदेंनी आपल्या गटासाठी शिवसेना-बाळासाहेब ठाकरे हे नाव निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता शिंदे आणि ठाकरे यांच्यातील संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

---------------

👉 मुख्यमंत्री ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान वर्षा सोडला, जिद्द सोडली नाही

👉 ‘काळ कसोटीचा आहे, पण संघर्ष आम्हाला नवीन नाही’, नगरमध्ये लागले फलक

👉 शिवसेनेचा ढाण्या वाघ आमदार गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले

Post a Comment

Previous Post Next Post