एकनाथ शिंदे गटातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात : राऊत


। मुंबई । दि.26 जुन 2022 । गुवाहाटीमधील काही आमदारांसोबत आत्ताच माझं बोलणं झालं आहे. त्यांची परत शिवसेनेसोबत येण्याची इच्छा आहे. ज्यांना परत यायचं आहे, त्यांच्यासाठी आमची दारं, खिडक्या सगळं खुलं आहे. गुवाहाटीमध्ये काय आहे ? मुंबईत या...इथे पार्टी करा, असे आवाहन खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना केले आहे.

राऊत म्हणाले की,  आसाममध्ये पूर आलेला आहे. हे लोक हॉटेललमध्ये पार्टी करत आहेत. भाजप हे सगळं करत आहे. धमक असेल तर निवडणूक लढा, असा आव्हान संजय राऊत यांनी बंडखोरांना केलं आहे. पुढे राऊत म्हणाले, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनले तर सांगा. आजही आमच्या लोकांना गुलाम बनवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, असे ते म्हणाले.

राऊत म्हणाले, की तिथे एकमेकांवर हल्ले झाले किंवा एकमेकांचे कपडे फाडले, तरी काहीही आश्चर्य वाटणार नाही. कारण आमदारांना जबरदस्ती डांबूल ठेवलं गेलं आहे. माझं काही आमदारांसोबत बोलणं झालं आहे, त्यांना परत यायचं आहे. यासोबतच राऊत यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं की हिंमत असेल तर राजीनामे द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असे ते म्हणाले. 

-----------------

👉 पांडुरंगाच्या मनात असेल, तोच मुख्यमंत्री महापूजा करेल

👉 बंडखोर आमदारांच्या घराबाहेर केंद्राकडून सुरक्षा

👉 एकनाथ शिंदे गटाकडून नाव निश्चितीकडे वाटचाल

👉  मुख्यमंत्री ठाकरेंचे बंडखोरांना आव्हान वर्षा सोडला, जिद्द सोडली नाही 

Post a Comment

Previous Post Next Post