’ईडी’कडून संजय राऊत यांची संपत्ती जप्त


। मुंबई । दि.05 एप्रिल । ईडीने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. शिवसेनेचे नेते आणि प्रवक्ते खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

खासदार संजय राऊत अलिबाग आणि दादर येथील संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.
संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्या पत्नीचे व्यवहार पुढे आले आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या मालकीचे अलिबागमध्ये 8 भूखंड आणि दादरमधील 1 फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केली
असल्याची माहिती समोर येत आहे

ईडीला कितीही उड्या मारु देत, ते तोंडावर पडणार : राऊत
आम्ही खोटेपणाला घाबरत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कारवाईने विरोधकांनी आपली कबर खोदण्यास सुरुवात केली असल्याचे ते म्हणाले. संजय राऊत सध्या दिल्लीत आहेत. ते म्हणाले, ’ईडीने कोणतीही नोटीस न देता माझ्या घरावर कारवाई केली आहे. ईडीला कितीही उड्या मारू देत, ते तोंडावर पडणार आहेत. माझे मुख्यमंत्र्यांशीही बोलणे झालेले आहे. तुम्हाला (ईडीला) फाट्यावर मारतो. संजय राऊत खोटेपणाला घाबरत नाही. तुम्ही तुमची कबर खोदायला सुरूवात केली आहे. दाम दुपटीने वसुल करु’. अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी देली आहे

Post a Comment

Previous Post Next Post