। मुंबई । दि.04 एप्रिल । केंद्रीय मंत्री भाजप नेते नितीन गडकरी राज ठाकरे यांच्या भेटीला त्यांच्या शिवतीर्थावर गेले. या ठिकाणी गडकरी आन् ठाकरे यांची भेट झाल्याने राजकीय वर्तळात विविध तर्क वितर्क लावले जात आहे.
गडकरी आणि राज ठाकरे यांच्यात मनसेच्या बदललेल्या भूमिकेवरून चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती संदर्भात चर्चा झाली का हे मात्र अस्पष्ट आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दोन तास चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भेट झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ही भेट सदिच्छा भेट असल्याचं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षापासून राज ठाकरे आणि आपल्या कुटुंबाचे सलोख्याचे संबंध आहेत. तसेच राज ठाकरे यांनी मुंबईतील नवीन घरी येण्याचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे आमंत्रणाचा स्वीकार करून आपण राज ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतल्याचं गडकरी यांनी सांगितले.
-----------------------------
खालील बातम्या देखील वाचा...
लग्नाआधीचे फोटो दाखवण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
Tags:
Politics