पोस्टल डिव्हीजन सोसायटीची निवडणुक बिनविरोधच्या वाटेवर


। अहमदनगर । दि.09 एप्रिल । प्रतिनिधी । कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तब्ब्बल दोन वर्ष लांबणीवर पडलेल्या अहमदागर पोस्टल डिव्हीजन सोसायटीच्या निवडणुकीला दि.15 फेब्रुवारी पासून सुरुवात हावून प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाली होती.

सदर यादीवर हरकतीची मुदत संपल्यानंतर दि.14 मार्चला अंतिम यादी प्रसिध्द करण्यात आली होती. तदनंतर निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहा.सहकार अधिकारी श्री.व्ही.के.मुटकुळे यांची नियुक्ती करण्यात आली.  

त्यानंतर  दि.01 एप्रिल  ते दि.08 मे या कालावधीपर्यत निवडणुक कार्यक्रम जाहीर होवून 1 एप्रिल ते 7 एप्रिल आर्ज विक्री व स्विकृती प्रकीया पार पडली. त्यानुसार आर्ज दाखल करण्याच्या अंतिम दि.7 तारखेला 11 जागेसाठी केवळ 11 आर्ज प्राप्त झाले.

यामध्ये सर्वसाधारण मतदार संघांच्या 6 जागेसाठी 6 व राखीव जागेसाठी प्रत्येकी 1 आर्ज व महिला राखीव 2 जागेसाठी 2 आर्ज प्राप्त झाले असल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकारी श्री व्ही के मुटकुळे यांनी दिली.

दि.08 एप्रिल राजी आलेल्या अर्जांची छाणनी होवून सोमवारी दि.11 एप्रिल रोजी सकाळी 11.00 वा. वैध उमेदवारी आर्जाची यादी जाहीर केली जााणार आहे.  

यानंतर दि.25 एप्रिल पर्यत आर्ज माघारीची अंतिम मुदत असून यानंतर बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली जाईल. राज्य कार्यक्षेत्र असलेली पोस्टल सोसायटी ही मोठया कालखंडानंतर बिनविरोध करण्यात सत्ताधारी गटाला यश आल्याने सभासदांकडुन त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

-----------------

खालील बातम्या देखील वाचा...

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

पोटच्या मुलीसह 24 वर्षीय महिलेची आत्महत्या 

वकील गुणरत्न सदावर्तेंना अखेर अटक...

Post a Comment

Previous Post Next Post