कापड बाजारासह मोचीगल्ली, गंजबाजारातील
अतिक्रमणांवर महापालिकेकडून पुन्हा कारवाई
। अहमदनगर । दि.02 एप्रिल । शहरातील बाजारपेठ परिसरातील अतिक्रमणांचा प्रश्न सध्या ऐरणीवर असून मागील आठवड्यात महापालिकेच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर पुन्हा काही अतिक्रमणे लागल्याने महापालिकेच्या पथकाने पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी (दि.1) दुपारी या अतिक्रमणांवर कारवाई केली आहे.
काही दिवसापुर्वी बाजारपेठेतील व्यापारी व हातगाड्यांची अतिक्रमणे लावणारे यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर व्यापार्यांनी एकत्र येत या अतिक्रमणांविरोधात आवाज उठविला. मंगळवारी (दि.26) व्यापार्यांनी दिवसभर उपोषण केले.
या उपोषणाला शहरातील सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकार्यांनी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला. सायंकाळी महापालिकेच्यावतीने बाजारपेठेतील अतिक्रमणांवर ठोस कारवाईचे आश्वासन दिल्याने व्यापार्यांनी आंदोलन मागे घेतले होते.
गुरुवारी (दि.31) मोचीगल्ली, गंजबाजार परिसरात पुन्हा अतिक्रमणे जैसे थे झाल्याने व्यापारी महासंघाच्यावतीने महापालिकेच्या अधिकार्यांना कळविण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी (दि.1) महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने मोठ्या पोलिस बंदोबस्तात येवून कापड बाजार, मोचीगल्ली, गंज बाजार परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई केली.
यावेळी काहींनी दुकानाबाहेर लावलेल्या ताडपत्र्या फाडून त्या जप्त करण्यात आल्या तसेच दुकानासमोर ठेवलेले लोखंडी टेबल, स्टॅण्ड जप्त करण्यात आले. पुन्हा जर अतिक्रमणे केली तर गुन्हे दाखल करण्याचा इशारा यावेळी महापालिकेच्या पथकाने दिला. या कारवाईमुळे बाजारपेठ परिसरातील सर्व रस्ते प्रशस्त दिसत होते.
------------------
खालील बातम्या देखील वाचा...
शनिवारी नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांद्याला काय मिळला भाव
मागील भांडणाच्या कारणावरून चौघांकडून एकास बेदम मारहाण
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मध्ये सुधारणा अक्रियाशील सदस्याची तरतूद रद्द