। अहमदनगर । दि.09 एप्रिल । रामनवमी उत्सवानिमित्त काढल्या जाणार्या मिरवणुकीला प्रशासनाच्या अटी-शर्तींचे पालन करण्याचे व योग्य आश्वासन दिल्यास खातरजमा करून परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
मागील पाच ते सहा वर्षांपासून नगर शहरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सात वर्षांपूर्वी रामनवमी उत्सवाच्या मिरवणुकीला आशा टॉकीज परिसरात गालबोट लागले होते. यातून जातीय दंगल शहरात घडली होती.
त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून रामनवमी उत्सवाच्या मिरवणुकीला परवानगी देणे बंद करण्यात आले होते. यावर्षी शहरात रामनवमी उत्सवाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचार्यांनी मिरवणूक मार्गाची शुक्रवारी पाहणी केली.
मिरवणुकीला परवानगी देण्यासाठी पोलिस प्रशासनाने काही अटी व शर्ती घालून दिल्या आहेत. या अटी-शर्तींचे पालन केल्यास व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे योग्य आश्वासन मिळाल्यास संबंधितांना मिरवणुकीसाठी परवानगी दिली जाईल, असे पोलिस अधीक्षक पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Tags:
Ahmednagar