राज ठाकरे यांच्या ‘त्या’ जागेवरील सभेला पोलिसांची परवानगी नाही!


। मुंबई । दि.07 एप्रिल । ठाण्यात गडकरी रंगायतन नाट्यगृहासमोरील डॉ. मूस रोडवर ९ एप्रिल रोजी होणार्‍या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र, अन्य ठिकाणी बंदिस्त सभागृहात किंवा खुल्या मैदानात सभा घेतली तरच परवानगी मिळणार असा पर्यायही पोलिसांनी सुचवला आहे. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर पोलीस आयुक्त जयजीत सिंग यांची भेट घेणार असल्याचे समजते.

९ एप्रिल रोजी डॉ. मूस रोडवर अनेक कार्यक्रम होणार असून राम नवमी, रमजान आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी तिथेच सभा घेतली तर कायदा सुव्यवस्था बिघडू शकते. त्यातच हा रहदारीचा मार्ग आहे. मात्र त्यांनी अन्यत्र सभा घेतल्यास त्यांना परवानगी देण्यावर विचार होऊ शकतो, असे ठाणे शहर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे यांनी म्हटले आहे.

मनसेने नौपाडा पोलिसांना याच जागेवरील सभेच्या परवानगीसाठी अर्ज दिल्यानंतर गडकरी रंगायतनसमोरील डॉ. मुस रोडची पाहणी मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी काल केली होती. मात्र मनसेच्या अर्जावर सभा नाकारल्याचा शेरा मारला आहे. त्यामुळे आता मनसे राज ठाकरे यांच्या सभेसाठी दुसरी कोणती जागा निवडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------- 

खालील बातम्या देखील वाचा...

उसतोड मिळत नसल्याने शेतकर्‍याने स्वतःला संपवले 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले श्री साईबाबांचे दर्शन  

भिंगार येथे मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन

Post a Comment

Previous Post Next Post