हद्दपार केलेला सराईत गुन्हेगार भिंगारमध्ये पकडला

। अहमदनगर । दि.09 एप्रिल । दोन वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार केलेला नगर तालुक्यातील सराईत गुन्हेगार वारूळवाडी शिवारातील मिरावली पहाड येथे आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक केली. अहमद अब्बास पठाण (वय 45 रा. कापूरवाडी, ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. 

त्याच्याविरूध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायदा कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार दिनेश मोरे यांनी फिर्याद दिली आहे.

पठाण याच्याविरुध्द विविध गुन्हे दाखल आहेत. त्याला अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात यावे असा अहवाल भिंगार कॅम्प पोलिसांनी अहमदनगर विभागाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविला होता. त्यांनी त्यावर निर्णय देत आरोपी पठाण याला 28 फेब्रुवारी 2022 रोजी दोन वर्षासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार केले होते. 

आरोपी पठाण हा मंगळवारी मिरावली पहाड येथे आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली होती. त्यानुसार कटके यांनी पथक नियुक्त करून आरोपीला अटक करण्याच्या सूचना केल्या. पथकातील अधिकारी, अंमलदार यांनी आरोपी पठाण याला ताब्यात घेत अटक केली.

Post a Comment

Previous Post Next Post