। अहमदनगर । दि.01 एप्रिल । विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या दारूचा मुद्देमाल श्रीगोंदा पोलिसांनी नुकताच नष्ट केला. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा पोलिस दलात मुद्देमाल निर्गती मोहीम चालू असल्याने बेलवंडी पोलीस स्टेशनला सन 2020-21 मधील सुमारे 15 गुन्ह्यात दारूबंदीतील दारूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. तो नष्ट करण्यात आला आहे.
प्रथम न्यायदंडाधिकारी श्रीगोंदा न्यायालय यांच्या आदेशान्वये तसेच अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अहमदनगर यांनीही गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्याबाबत सूचना दिल्याने राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक जी. टी. खोडवे, उपनिरीक्षक सचिन वामने, बेलवंडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक राजेंद्र चाटे आणि हेड कॉन्स्टेबल हसन शेख, पोलिस हवालदार ज्ञानेश्वर पठारे, सहाय्यक फौजदार सुनील मोरे,
पोलिस कॉन्स्टेबल भांडवलकर, पोलिस कॉन्स्टेबल सोनवणे, पोलिस नाईक सुरेखा वलवे, अविनाश जाधव, लोंढे व दोन पंचासमक्ष या मुद्देमालाबाबत योग्य त्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून सकाळी 10 वाजता पोलिस स्टेशनच्या पाठीमागील बाजूस मोकळ्या जागेत खड्डा खोदून त्यामध्ये गुन्ह्यातील दारूचे वेगवेगळे बॉक्स फोडून दारूच्या बाटल्यांचे सील तोडून दारू खड्ड्यात ओतून नष्ट करण्यात आली
व खड्डा मातीने बुजवण्यात आला. दरम्यान, बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दुधाळ यांनी जनतेला आवाहन केले की पोलिस स्टेशनच्या हद्दीत अवैधरित्या दारू, जुगार, मटका इतर अवैध धंदे कोणी करीत असतील तर त्यांची माहिती तात्काळ बेलवंडी पोलिस स्टेशनला कळवावी. कोणाचीही गय न करता अवैध धंदे करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
-------------------
खालील बातम्या वाचा...
पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी
पीककर्जाचे प्रमाण वाढविणार : अॅड. उदय शेळके
उड्डाणपुलाचे काम करताना महावितरणच्या केबल तोडल्या : गुन्हा दाखल