। अहमदनगर । दि.04 एप्रिल । रमजानच्या पोर्शभूमीवर नगर शहरातून होणारी अवजड वाहतूक शहराऐवजी पर्यायी मार्गाने वळवावी, अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे शहर वाहतूक शाखेला निवेदनाद्वारे केली आहे.
ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळवल्यास नागरिक व्यवस्थितपणे आणि सुरक्षित पहाटे व रात्री घराबाहेर पडू शकतील, असे म्हणणे या निवेदनात मांडण्यात आले आहे.
शहरातील स्टेशन रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम सुरु असल्याने रात्री ते सकाळपर्यंत औरंगाबाद महामार्गावरुन येणारी अवजड वाहनांची वाहतूक रमजानच्या पोर्शभूमीवर झेंडीगेट, कोठला व सर्जेपुरा मार्गाने न वळविता पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार यांनी शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्याकडे केली. यावेळी शहर उपाध्यक्ष अब्दुल खोकर, शहानवाज शेख आदी उपस्थित होते.
--------------------
खालील बातम्या देखील वाचा...
छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक नूतनीकरण उदघाटन
साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण…
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अन् मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट