जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे नुकसान झालेले नाही : दिग्विजय आहेर
। अहमदनगर । दि.01 एप्रिल । जिल्हा सहकारी बॅंकेच्या तिसऱ्या मजल्यावरील एका विभागाला शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास आग लागली. आगित किती नुकसान झाले हे देखील समजु शकले नाही.
जिल्हा बॅंकेच्या इमारतीतच तिसऱ्या मजल्यावर जिल्हा सहनिबंधकांचे कार्यालय आहे. सायंकाळी सात वाजता धूर निघताना अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
त्यांनी तातडीने अग्निशामक दलाला व बँकेच्या अधिकार्यांना याबाबत माहिती दिली. अग्नीशामक दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्याने आग आटोक्यात आली.
या आगीत मोठे नुकसान झाले आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही. तसेच आगित किती नुकसान झाले हे देखील समजु शकले नाही.
जिल्हा बँकेच्या तिसर्या मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालय आणि जिल्हा बँकेची काही विभागाची कार्यालये आहेत. सायंकाळी 6.45 वाजता बँकेच्या लेखापरीक्षण विभागामधून धूर निघाल्याचे DDR कार्यालयाच्या कर्मचार्यांना निदर्शनास आले. सदर विभागाचा दरवाजा बंद होता. आम्ही तातडीने अग्निशामक दलास पाचारण केले. तोपर्यंत DDR कार्यालयाच्या कर्मचारी आणि बँकेच्या स्टाफ च्या मदतीने उपलब्ध संसाधन च्या मदतीने आग आटोक्यात आणायचा प्रयत्न केला. त्यानंतर मनपा आणि MIDC च्या अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे एका तासाच्या प्रयत्नांनी आग विझवण्यामध्ये यश आले. सदर आगीमध्ये बँकेच्या लेखापरीक्षण विभागाची खोली पूर्णपणे जळून खाक झाली. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे अजिबात नुकसान झालेले नाही. कोणत्याही प्रकारची जीवितहानी/ दुखापत झालेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार विजेच्या shock सर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज आहे.दिग्विजय आहेर
जिल्हा उपनिबंधक
अहमदनगर
Tags:
Breaking