छत्रपती चौथे शिवाजी महाराज स्मारक नूतनीकरण उदघाटन


। अहमदनगर । दि.04 एप्रिल । छत्रपती चौथे शिवाजी महाराज जयंतीनिमित्त येथील स्मायलिंग अस्मिता कष्टकरी शेतकरी विद्यार्थी संघटनेने छत्रपतींच्या स्मारकाचे नूतनीकरण केले असून, त्याचे लोकार्पण खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते मंगळवारी (5 एप्रिल) सकाळी 11 वाजता होणार आहे.

या कार्यक्रमाच्यावेळी जिल्ह्यातील काही शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना मदत करणार्‍यांना स्वराज्याचे पहिले चलन शिवराई देऊन गौरविण्यात येणार आहे. यावेळी शिल्पकार विकास प्रकाश कांबळे यांचे शिल्प प्रात्यक्षिक होणार आहे, अशी माहिती स्मायलिंग अस्मिताचे कार्याध्यक्ष यशवंत तोडमल यांनी दिली आहे.

या कार्यक्रमात छत्रपती संभाजीराजे शेतकरी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. प्रा.सदाशिवराव निर्मळे,ऋषिकेश दुसंग, अभिजित दरेकर,शुभम पांडूळे, गजानन भांडवलकर, अजित कोतकर, सचिन सापते,अस्लम शेख,धिरज कुमटकर, भाग्यश्री वांढेकर, अक्षय शेळके, जैद शेख,संभाजी कदम आदी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.

मागील 13 वर्षांपासून स्मायलिंग अस्मिताच्या माध्यमातून छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचा इतिहास जगासमोर यावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संघटनेच्या पाठपुराव्यामुळे आतापर्यंत संरक्षक भिंत आणि वाचनालय हॉलची दुरुस्ती झाली आहे आणि आता तेथेच सुशोभीकरण नुकतेच करण्यात आले आहे; त्यासाठी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी निधी दिला होता. लवकरच पुढच्या टप्प्यात आमदार निधीतून त्याठिकाणी समाधीवर मेघडंबरी, स्मारकास रेखीव कमान आणि पुतळा सुशोभीकरण होणार आहे. 

-------------------

खालील बातम्या वाचा...

साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण… 

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अन् मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट  

लग्नाआधीचे फोटो दाखवण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार 

Post a Comment

Previous Post Next Post